छत्रपती राजर्षी शाहू महाराज

छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचा जन्म २६ जून १८७४ रोजी कागलच्या जाहागीरदार घाटगे घराण्यातील जयसिंगराव आणि राधाबाई ह्या दांपत्याच्या पोटी झाला. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव यशवंराव होते. चौथ्या शिवाजी राजांच्या अकाली निधनानंतर ते १७ मार्च १८७४ रोजी कोल्हापूरच्या गादीवर दत्तक गेले. राजकोट व धारवाड येथे त्यांचे शिक्षण झाले, सर फ्रेजर व रघूनाथराव सबनीस यांसारखे गुरू त्यांना मिळाले. विद्यार्थीदशेत त्यांनी इंग्रजी, संस्कृत, इतिहास ,राज्याशास्त्र इ. विषयांचा अभ्यास केला. सन १८९१ मध्ये बडोद्याचे गुणाजीराव खानवीलकर यांच्या लक्ष्मीबाई या कन्येबरोबर त्यांचा विवाह झाला. त्यांना राजाराम व शिवाजी हे दोन मुलेगे आणि राधाबाई (अक्करसाहेब) व आऊबाई या दोन कन्या झाल्या.
छत्रपती शाहूमहाराजांना २ एप्र‍िल १८९४ रोजी राज्याधिकार प्रात्प झाला. महाराष्‍ट्रातिल करवीर तथा कोल्हापूर छत्रपती शाहू महाराज संस्थाने प्रगतिक आधिपती आणि थोर समाजसुधारक होते. प्राथमिक शिक्षण, जातिभेद-निवारण, अस्पृश्यता-निवारण इ. सुधारणांचे पुरस्कर्ते आहेत.
वेदोक्त प्रकरणातील अनुभवावरून, भिक्षुकशाहीच्या जाळ्यातून मुक्त झाल्याशिवाय उच्चवर्णियांची धार्मिक व सामाजीक मत्केदारी नष्ट होणार नाही,अशी शाहू महाराजांची धारणा झाली होती. परिणामी ते महात्मा जोतीराव फुलेंच्या सत्यशोधक विचारसरणीकडे आकृष्ट झाले. त्यांनी उघडपणे त्यांचे अनुयायीत्व स्वीकारले नसले, तरी सत्यशोधक तत्वांना त्यांचा पाठिंबा होता. त्यांच्या प्रोस्ताहानामुळे महाराष्ट्रात सत्यशोधक समाजाचे पुनरुज्जीवन झाले.
बहुजनसमाज शिकून शहाणा झाल्याशिवाय त्यांचे दारि्द्र, अज्ञान नष्ट होणार नाहीत, हे जाणूंन शाहूनी शिक्षणाच्या, विशेषत: प्राथमिक शिक्षणाच्या प्रसारावर भर दिला. त्यानुसार त्यांनी १९१७ साली आपल्या संस्थानात सक्तीचा मोफत प्राथमीक शिक्षणाचा कायदा केला आणि तो आमलात आणला. खेड्यापाड्यातील मुंलाना उच्चशिक्षणाची सुविधा मिळावी म्हणून शांहूनी काल्हापूरात मराठा, जैन, लिंगायत, मुस्लीम, सुतार, नाभिक, महार, चांभार-ढोर इ. जतिजमातींसाठी वसतिगृहे स्थापन केली. शिवाय नाशिक, पुणे नगर, नागपूर इ. अन्य ठिकाणी त्यांच्या प्रेरणेने अनेक वसतिगृहे सुरू केली गेली. त्यांच्या या उपक्रमामुळे महाराष्ट्रातील अनेक पिंढ्या शिकून तयार झाल्या.
मागासलेल्या जातींत शिक्षणाबदृल फारशी अस्था नसल्याने व त्यांचे कारण शिक्षण घेऊनही सरकारी नोकरी लाभण्याची शक्याता नसल्याने छत्रपती शाहू महाराजांनी २६ जुलै १९०२ रोजी कोल्हापूर संस्थानातील ५०% शासकिय नोकऱ्या मागासलेल्या वर्गासाठी राखीव ठेवल्याचा जाहिरनामा काढला. राखिव जागांचे धोरण अमलात आणणारे छत्रपती शाहू महाराज हे हिंदूस्थानातील पहिले राज्यकर्ते ठरले.
अस्पृश्यतेबरोबर जातिभेदाशी शांहूनी अखेरपर्यत संघर्ष केला. १९१९ साली छत्रपती शाहू महाराजांच्या कार्याचा गौरव म्हणून कानापूर येथे कुर्मी क्षत्रीय सभेने त्यांना “राजर्षी” पदवी बहाल केली. त्यांच्या कार्यामुळे दलित-पतितांचा उव्दारककक, रयतेचा राजा म्हणून त्यांची प्रतिमा नमसामान्यात निर्माण झाली. या राजाने अज्ञानी बहुजन समाजाला जागृत करण्याचे व्रत अखेरपर्यंत सांभाळले. अखेरच्या दिवसांत व्दितीय चिंरजीव शिवाजी यांच्या अपघाती निधनाने ते खचून गेले, तशातच मधूमेहाने वे ग्रासले होते. अखेर मुंबई येथे ६ मे १९२२ रोजी वयाच्या अवघ्या अठ्ठेचाळीसाव्या वर्षी हदयविकाराने निधन झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *